आ. राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध प्रलंबित योजनांची दक्षता घेण्याचे निर्देश
अमरावती (महेंद्रसिंग पवार) मेळघाट विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रीय आ. राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात विविध प्रलंबित विकास योजना 25/15, 3054, मातोश्री पांधन रस्ते योजना, तीर्थक्षेत्र विकास योजना, बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवन बांधकाम योजना, MREGS, गट ग्रामपंचायत मधून नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचे प्रस्ताव तयार करणे, या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी व सर्व योजनांचा फायदा जनतेला होऊन, कुठलाच निधी परत जाणार नाही अशी दक्षता घेण्याचे निर्देश आमदार पटेल यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पं. स.सदस्य रोहित पटेल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टेकाडे,कार्यकारी अभियंता जी. प.बांधकाम विजय वाठ, उपविभागीय अभियंता ठाकरे, लाहोरे, प्रकाश घाडगे, प्रवीण तेलगोटे, अंकुश पाटील, निखील गाले आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते.