केन्द्रीय विद्यालय आँ.फॅ.भुसावळ च्या वतीने तिरंगा रैली.
"नो प्लास्टिक यूज़" चा संदेश देण्याकरिता ई.९वी (अ) च्या विद्यार्थ्यांनी पेपर बैग चे केले वाटप.
दिनांक: १३ आँगस्ट २०२२
भुसावळ प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान
भुसावळ: आगामी १५ आँगस्ट रोजी साजरा होणारा ७५ व्या स्वतंत्रता दिवसानिमित्त”आजादी का अमृतमहोत्सव” अंतर्गत भुसावळ येथील केन्द्रीय विद्यालय आँ.फॅ.भुसावळ च्या वतीने दि.१२ रोजी तिरंगा रैली काढण्यात आली. सदर रैली केंद्रीय विद्यालय आँ.फॅ.भुसावळ येथुन सुरु होवून आँ.फॅ.स्टेट येथील डाॅ.बाबासाहेब उद्यान पासून परत केंद्रीय विद्यालय येथे समाप्त झाली. रैली ला के.व्ही.चे प्रभारी प्राचार्य नितिन उपाध्याय यांनी हिरवी झेंडी दाखवून रवानगी दिली.
रैलीत शाळेतील ई. ३री ते १२वी. पर्यंतचे ५५० विद्यार्थ्यांनी
“वंदे मातरम” “भारत माता की जय” “स्वतंत्रदिन जिंदाबाद”
“हर घर तिरंगा लहराना है भारत की शान बढाना है”
असे जयघोष दे उत्साहाने रैलीत सहभाग घेतले.
दरम्यान शिक्षिका सीमा बाथम (TGT eng) यांचा मार्गदर्शना खाली ई.९ वी (अ) च्या विद्यार्थ्यांनी “नो प्लिस्टिक यूज” चा संदेश देत स्वयंतयार केलेले पेपर बैग दुकानदारांना देण्यात आले.
तसेच आँ.फँ.स्टेट येथील डाॅ.बाबासाहेब आंबेंडकर उद्यान समोर लेफ्ट.कर्नल सुशील कुमार (सुरक्षा अधिकारी) यांचा ही विद्यार्थयांनी पेपर बैग देऊन स्वागत केले.
प्रभारी प्राचार्य नितीन उपाध्याय यांनी “हर घर तिरंगा” मुहीम अंतर्गत सर्व देशवासियांनी आपआपल्या घरी तिरंगा फडकवावे तसेच तिरंगा ही आपली शान असुन त्याचे अपमान होऊ नये याची विशेष रुपे काळजी घ्यावीत असे संदेश स्पीड न्यूज महाराष्ट्र चा माधयमातून सर्वाना दिले. सदर तिरंगा रैली प्रभारी प्राचार्य नितीन उपाध्याय यांचा मार्गदर्शनाखाली सुरेश नरहिरे (एचएम), रंजना विगम, संध्या परदेशी, अखिलेश पांडे, संदीप पवार, गिरीष महाजन, सीमा बाथम,नीलिमा पाथरकर, शाळेतील अन्य शिक्षकगण व इतर कर्मचारी यांचा सहभागाने पार पडली.