मळद सोसायटीवर भैरवनाथ बहुजन सहकार पॅनलचे वर्चस्व
मळद : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भैरवनाथ बहुजन सहकार पॅनलने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला व आपली सत्ता स्थापन केली. 13 पैकी 12 जागांवर विजय संपादन केला आणि पूर्वीच एक जागा बिनविरोध निश्चित झाली होती.
भैरवनाथ बहुजन सहकार पॅनलचे निवडून आलेले उमेदवार खालीलप्रमाणे
1) आबा मुकिंदा शेलार-337
२) किसन आनंदराव शितोळे-331
३) सचिन चंदर रणवरे-329
४) नवनाथ अशोक गायकवाड-327
५) शशिकांत दत्तात्रय जाधव-325
६) जालिंदर किसन निंबाळकर -323
७) बापू संभू झगडे-320
८) हमीद नबीभाई सय्यद-319
महिला प्रतिनिधी मध्ये
९) प्रमिला विलास जाधव-322
१०) जयश्री संतोष शेलार-318
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग
११) अशोक एकनाथ साळवे-332
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
१२) दत्तात्रेय दगडू शेलार -344
वरील सर्वजण बहुजन सहकार पॅनलचे उमेदवार आहेत व भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग
१३) मल्हारी बाबुराव खटके यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशाप्रकारे बहुजन सहकार पॅनल उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे. भैरवनाथ बहुजन सहकार पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सदस्य बबन रणवरे, संपत शेलार, शफिक मुलाणी, दत्तात्रय शेलार, बशीर सय्यद, दिलीप जाधव यांनी केले होते आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश शितोळे यांनी कामकाज पाहिले होते.



