शिंदखेडा शहरात शहीद स्मारक व सभागृह बनविण्याबाबत खान्देश रक्षक ग्रुपचे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेड़ा तालुक्याचे ठिकाण असुन शहरात कित्येक वर्षापासून शहीद स्मारक वास्तव्यात नाही. शहरातील आजी माजी सैनिक, अर्धसैनिक तसेच तालुक्यातील शहीद परीवारांच्या भावनेचा आदर ठेवून, शहरातील साईलीला नगर येथील ओपन स्पेस (पाण्याच्या टाकी जवळ) जागा आरक्षित करून शहीद स्मारक व सभागृह बनविण्यात यावे याकरिता खान्देश रक्षक ग्रुपतर्फे मुख्याधिकारी नगरपंचायत प्रशांत बिडगर यांना निवेदन देण्यात आले.
गटनेते अनिल वानखेड़े यांनी म्हटले की, सदर विषय लवकरच मासिक मीटिंगमध्ये घेवून स्मारकासाठी जागा आरक्षित करू असे आश्वासन दिले. यावेळी खान्देश रक्षक ग्रुपचे पदाधिकारी ज्ञानेश्वर गिरासे, भूषण पवार, नितिन मिस्त्री, प्रमोद गुरव, नंदलाल साळुंखे, देवीदास कोळी, ईश्वर सोनवणे, संजीव नगराळे, ए आर शेख अलाउद्दीन, प्रमोद बोरसे, भावसिंग गिरासे आदी उपस्थित होते.