बाबासाहेबांच्या जयंतीदिनी वनिता खरातची पोस्ट म्हणाली ‘उद्धरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे’

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येकजण त्यांना विविध माध्यमांतून आदरांजली अर्पण करत आहेत. सोशल मीडियावर तर अनेकांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील आघाडीची अभिनेत्री वनिता खरात हिनं देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांचे हजारो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात वनिता खरात हिनं देखील एका खास पोस्ट शेअर केली आहे. वनितानं बाबासाहेबांना आदरांजली वाहणारी पोस्ट करताना एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वनितानं हातामध्ये बाबासाहेबांचा फोटो हातात धरलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत वनितानं लिहिलं आहे की,’उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…’ अशा शब्दांत तिनं भावना व्यक्त केल्या आहेत.