महाराष्ट्र
विरदेल युवा उपसरपंच यांचा वाल्या सेनेच्या वतीने सत्कार
विरदेल (प्रतिनिधी) वाल्या सेना गृप महाराष्ट्र च्या वतीने विरदेल येथील आदिवासी टोकरे कोळी जमातीचे युवा उपसरपंच सुनील कोळी यांची विरदेल ग्रामपंचायतपदी बिनविरोध निवड झाल्याने सत्कार करण्यात आला.
यावेळी वाल्या सेना गृप च्या मार्गदर्शक गीतांजली कोळी, शिंदखेडा तालुका संपर्क प्रमुख महेश कोळी, कार्याध्यक्ष विशाल ईशी, दोंडाईचा प्रमुख गोपाल चव्हाण, मालपूर प्रमुख गौरव कोळी, हाच्छी प्रमुख राकेश कोळी यांनी सत्कार केला यावेळी विरदेल चे वाल्या सेना कार्यकर्ते पारस कोळी, संदीप कोळी, भटू कोळी यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते अविनाश कोळी तसेच विरदेलच्या सरपंच सुवर्णा बेहरे व बहेरे दादा उपस्थित होते.