शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सोयगाव येथे शिवसेनेची प्रचंड जाहीर सभा संपन्न
सोयगावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे मतदारांना अवाहन
सोयगाव (विवेक महाजन) शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे हित समोर ठेवून विकास साधण्याची धमक फक्त शिवसेनाच करु शकते. यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सोयगावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील प्रचार सभेत केले.
जनता आता भाजपच्या भूल थापांना बळी पडणार नाही, सोयगावची जनता ही विकासाच्या म्हणजेच शिवसेनेच्या पाठीशी असून आजची ही प्रचंड सभा ही शिवसेनेच्या विजयाचे प्रतीक असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. सोयगाव नगर पंचायत निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार रोजी प्रदीप चित्र मंदिर परिसरात प्रचंड सभा संपन्न झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल,तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, देविदास पा. लोखंडे, तालुका संघटक दिलीप मचे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, ज्येष्ठ नेते अशोक सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, सिल्लोड चे शिवसेना नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर जाधव, राजू गौर, शिवसेना महिला आघाडीच्या धृपताबाई सोनवणे, डॉ. अस्मिता पाटील आदींची उपस्थिती होती.
भाजप मंत्री दानवे यांच्या आरोपाचा घेतला जोरदार समाचार
दुपारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावलेल्या आरोपाचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार समाचार घेतला. निवडणूक आली म्हणून भाजपचे नेते आता सोयगावात दिसत आहे. यापूर्वी कोरोना सारख्या संकटात आपण कोठे होता असा सवाल उपस्थितीत करून उद्याची निवडणूक झाली की पुढचे 5 वर्ष हे लोक दिसणार नाही असा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला. भाजप हा केवळ उधोगपतींचा पक्ष आहे. केंद्रातील भाजपच्या सत्ताकाळात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली . केवळ सत्तेचा दुरूपयोग करणे एव्हढेच काम भाजपला जमते अशा शब्दांत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपला विकासाशी काहीही घेणे देणे नाही असे स्पष्ट करीत भूल थापांचे राजकारण करणाऱ्या भाजपला सत्तेपासून रोखून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
भाजप विश्वास घात करणारा पक्ष – नरेंद्र त्रिवेदी
सोयगाव शहरातील अंतर्गत रस्त्याचा विकास हा शिवसेनेने केलेला आहे. भाजप केवळ खोटे बोलून राजकीय पोळी भाजण्याचे काम करतो. शिवसेना ही केवळ 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करते. भाजप केवळ पाठीत खंजीर आणि विश्वास घात करण्याचे काम करते. अशा लोकांना घरी बसवून सोयगावच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तसेच सोयगावच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी यावेळी केले.
शिवसेनेच्या जाहीरनामा चे प्रकाशन
यावेळी शिवसेनेच्या वतीने विकासाचा संकल्पनामा हा जाहीरनामाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या जाहीरनाम्यात सोयगावच्या रस्ते विकास, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, सुशोभीकरण, वाचनालय,सामाजीक सभागृह रोजगार निर्मिती पायाभूत व सर्वसमावेशक विकासासाठी या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. सोयगावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन या जाहीरनाम्यात करण्यात आले आहे.