Horoscope : आजचे राशिभविष्य, सोमवार २३ मे २०२२ !
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृषभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.
कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
वृश्चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पार पडतील.
मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.