महाराष्ट्र

आम आदमी पार्टी उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात युवानीं केला पक्ष प्रवेश

नागपुर (महेंद्रसिंग पवार) आज शहीदे आजम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मृिदिनानिमित्त आम आदमी पक्ष उत्तर नागपूर विधानसभात आज मोठ्या प्रमाणात युवा च्या समावेश झाला आहे. आज युवा शहीदे आजम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना प्रेरणास्रोत ठेऊन अगदी लहान वयात देशासाठी देशभक्ती चे पराक्रम आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे.

या करिता क्रांती करून आवाज उचलून आंदोलन करायचे. भगत सिंह राजगुरू आणि सुखदेव हे तीन भारतातील महान क्रातिकारा पैकी एक होते. या तिघांनी मिळून स्वतंत्र लढा दिला. या तिघांनी जोडीने इंग्रजाच्या नाकात दम करून ठेवला भगत सिंह राजगुरू आणि सुखदेव हे तुरुंगामध्ये देखील सोबतच होते आणि ह्यांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आली. भगत सिंह हे खूब मोठे क्रांतिकारक होऊन गेले. भगत सिंह यांना अगदी लहान वयामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण झालं त्यानी देशाला इंग्रजांच्या त्रासातून मुक्त करण्याचं ठरवलं होतं इंग्रजापासून भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्याचा वसा त्यांनी घेतला होता शिक्षणाच्या वयात त्यांनी आपल्या उच्च विचारांनी आपल्या वयाचा युवा पिढीला देश प्रेमाबद्दल माहिती देऊन स्वतंत्र लद्यामध्ये समाविष्ट करून घेतलं.

त्यांनी युवा पिढीला मनामध्ये इंगरजांविरुध्द द्वेष निर्माण करून दिला इंग्रज कशे आपल्या भारतावर राज्य करू पाहत आहेत हे युवा पिढीला समजावून सांगितल आणि त्यांना आपल्या बाजूने वळवून क्रांतिकारक चळवळ सुरू केली. त्या काळातील देशातील महान क्रांतिकारकंनी मधील भगत सिंह हे लहान वयाचे क्रांतिकारक होतें एवढ्या लहान वयामध्ये त्यांना देश प्रेम जाणवलं आणि देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजाविरुध्द आवाज उठवला. आज देशात अशीच काही राजनीतिक पार्टी आणि नेत्यापाई सुध्या तेच परिस्थिती निर्माण झाली आहे युवा बेरोजार झालेला आहे महेगाई इतकी वाढलेली आहे की सर्व साधारण लोक स्वताला गुलाम समजु लागले आहे. आज देशात एक क्रांती घडवून आनण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने लोकांना एक विश्वास पटला आहे. या विश्वासात मोठ्या संख्येने आम आदमी पक्षात प्रवेश करत आहे. आज उत्तर नागपूर विधानसभेत मोठ्या संख्येने युवा पिढीनी प्रवेश केला आहे.

यात उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष रोशन डोंगरे, उत्तर नागपूर विधानसभा संघटन मंत्री प्रदिप पौनिकर, उत्तर नागपूर विधानसभा सचिव गुणवंत सोमकुवर, आप युवा विदर्भ संयोजक पियूष आकरे, आप युवा राज्य समिति मेंबर कृतल आकरे, नागपूर आप युवा उपाध्यक्ष गौतम कावरे, आप उत्तर नागपूर युवा अध्यक्ष स्वप्नील सोमकुवर, आप युवा सचिव पंकज मेश्राम, आप युवा उपाध्यक्ष शुभम मोरे, वार्ड अध्यक्ष राजकुमार बोरकर. याप्रसंगी नवीन कार्यकरते निशिकांत माटे, अमोल बोदिले अनुराग जम्बूलकर, देवेन्द्र नारायण, शुकरू रामटेके, दादू मेश्राम, अभिषेक सरजारे, सूरज नागदवने, शुभम रामटेके, स्नेहा जगभीये अश्विनी सहारे, अविनाश सोरते, पवन मोरे, प्रणाली चरदे, मोहम्मद रज़ाउल्ला, अरशद शेक, अनुराग जम्बूलकर, सुमित गेड़ाम, नीरज नागदावे, अभिषेक सिंघारे, सुकरू रामटेके, प्रणाल मेश्राम, देवेंद्र रीनाइट इत्यादिनी प्रवेश घेतला.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे