Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शुक्रवार २४ जून २०२२ !
राशिभविष्य, शुक्रवार २४ जून २०२२ : आर्थिक बाबतीत शुक्रवारचा दिवस अनेक राशींसाठी आर्थिक लाभाच्या अनेक संधी घेऊन येणार आहे. आज अनेक राशींना प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे.
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. हितशत्रूंवर मात कराल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कन्या : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
तूळ : सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.
वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मकर : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.