माधवगार्डन अंतर्गत माधव गार्डनचा शुभारंभ
धुळे (प्रतिनिधी) जेष्ठ पत्रकार महेशबाबा घुगे यांनी विकसित केलेल्या आणि महेश माळी व युवराज माळी या ऊमद्या ऊद्योजकांनी नव्याने साज चढविलेल्या माधव गार्डन अंतर्गत मँरेज लाँन्सचा शुभारंभ खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापू खलाणे, अरविंद जाधव, मंडप असोसिएशनचे अध्यक्ष धनराज सोनावणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मुबंई – आग्रा महामार्गावरील, वरखेडी चौफूली परिसरातील, महेश घुगे यांच्या शेतात स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे यांचे स्मरणार्थ तरुण ऊद्योजक महेश माळी व युवराज माळी यांनी नव्याने कायापालट केलेल्या माधव गार्डनमध्ये डॉ मधुकर चौधरी यांचे चि. यांचा विवाह संपन्न झाला. त्यावेळी ऊपस्थीत खा, सुभाष भामरे यांचे हस्ते गणेशा समोर नारळ फोडून माधवगार्डन म्ँरज लाँन्सचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ऊपस्थीत सन्माननीय अतिथींनी महेश माळी व युवराज माळी यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
धुळे शहरापासून बाहेर पण धुळे शहरापासून अशघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर, मुबंई – आग्रा महामार्गावरील वरखेडी चौफूली परिसरातील, स्वा. सैनिक माधवराव घुगे मार्गावर, निसर्ग दत्त वातावरणात, अबाल व्रुद्धांना ऊल्हासित करणारे “माधव गार्डन” विकसित करण्यात आले आहे. याच गार्डनमध्ये मँरेज लान्सही विकसित करण्यात आले आहे. त्याचा लाभ समाजातील सर्व स्तरातील लोकांनी घ्यावा असे आवाहन महेश घुगे, महेश माळी आणि युवराज माळी यांनी केले आहे.