वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन !
जळगाव (प्रतिनिधी) तांबापुरा परिसरातील अतिक्रमण विषयी व तांबापुरा परीसरातील बांधवांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलनाला बसले असून यासंदर्भात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील महादेव मंदिर ते शिरसोली नाका व शामा फायर परिसरातील बांधवांचे अतिक्रमण विषयी आपणास दि. ३१/०१/२०२२ रोजी आपणास निवेदन दिले आहे. परंतु आपलेकडून आमचे निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल आपल्या कडून घेण्यात आलेली नाही म्हणून आज दिनांक ०३/०२/२०२२ वार गुरूवार सकाळी ११:३० वाजता आम्ही आपले कार्यालयासमोर तांबापुरा परीसरातील बांधवांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहात.
आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत :
१) जळगाव शहराच्या विकासासाठी अतिक्रमण काढण्यास आमचे समर्थन
२) अतिक्रमण काढतांना गोरगरीब जनतेचे कुटूंब रस्त्यावर येऊ नये याची काळजी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन यांनी घ्यावी.
३) तांबापुरा परिसरातील महादेव मंदिर ते शिरसोली नाका ते शामाफायर परिसरातील अतिक्रमण काढतांना तेथील जनतेला पर्यायी जागा द्या किंवा मेहरूण परिसरातील ७० % बांधकाम पुर्ण झालेली घरकुल पुर्ण बांधुन तेथील जनतेला तात्काळ देण्यात यावी तोपर्यंत अतिक्रमण काढण्यात येऊ नये, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव वैभव शिरतूरे,जिल्हा अध्यक्ष पूर्व विभाग विनोद सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, महानगरप्रमुख दीपक राठोड, महानगर महासचिव नारायण अटकोरे, महानगर उपाध्यक्ष मनोज अडकमोल, नेते जितेंद्र केदार, नेते गमीरभाई शेख, प्रसिद्धीप्रमुख संजय शिंदे, महानगर सचिव प्रवीण इंगळे आदींच्या सह्या आहेत.


