महाराष्ट्र
राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील धमाणे येथे नगाव येथील गंगामाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाचे हिवाळी शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक प्रवीणकुमार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस आर पाटील होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर भदाणे, धमाणेचे सरपंच रमेश बैसाणे, राजेंद्र गवते, बाबूराव शिरसाठ, मुख्याध्यापक मनोहर पाटील प्रमुख पाहुणे होते. सूत्रसंचालन डॉ पी व्ही अहिरराव यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी अंजीर भील यांनी तर आभार डॉ जी एन पाटील यांनी मानले. शिबिरात विविध उपक्रम राबवण्यात आले.