नाशिकच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधात तहसीलदारांची संघटना एकवटली
नाशिक : पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी महसूल अधिकारी यांच्याबद्दल पत्राद्वारे अनुदार उदगार काढल्याने महाराष्ट्रातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र संतापाची भावना आहे महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दीपक पांडेय महसूल अधिकारी आणि पोलीस विभागामध्ये वाद लावण्याचे कारस्थान रचत असल्याची व महसूल अधिकारी व पोलिस विभाग आतापर्यंत चांगल्या वातावरणात प्रशासन चालवीत असताना हे चांगले प्रशासकीय वातावरण बिघडविण्याचे काम दीपक पांडेय करीत असल्याची भावना महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांची आहे.
राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटना यांच्या वतीने काल नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी महसूल विभागाबद्दल लिहिलेल्या अपमानकारक पत्राच्या अनुषंगाने निषेध नोंदवण्यासाठी नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार , नायब तहसीलदार यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दीपक पांडेय यांच्याविरोधात निषेधाचे निवेदन दिले निवेनाद्वारे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी 10 एप्रिल पर्यंत महसूल विभागाची बिनशर्त माफी मागावी, शासनाला दिलेले पत्र विनाशर्त मागे घ्यावे.. शासनाने दीपक पांडेय यांच्यावर त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्य करिता प्रशासकीय कारवाई करावी. 10 एप्रिल पर्यंत कारवाई न झाल्यास 11 एप्रिल रोजी तहसीलदार, नायब तहसीलदार , संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील संघटनेचे प्रत्येक विभागातील व जिल्ह्यातील पदाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे तीव्र आंदोलन करणार आहेत.