राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत शहापूर तालुक्यात जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
शहापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सत्यधर्म आश्रम, वाफेपाडा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हास्तरीय कार्यशाळेस डी.एस.घोलप तंत्र अधिकारी, जिअकृअ कार्यालय, ठाणे, कृषी विज्ञान केंद्र, नागाव ता. मुरबाड येथील शास्त्रज्ञ अस्मिता तुपे व कु.प्रणिता ठाकरे तसेच कल्पेश दुधाळे डिआरपी PMFME, ठाणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे प्रस्तावित करताना अमोल अगवान तालुका कृषी अधिकारी, शहापूर यांनी उपस्थितांना सविस्तर NFSM योजना व नागली, वरई या पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, नागाव येथील शास्त्रज्ञ कु. प्रणिता ठाकरे. यांनी नागली पिक लागवड विषयावर तर शास्त्रज्ञ अस्मिता तुपे यांनी नागली पिकापासून बनविण्यात येणारे विविध प्रकारचे पदार्थ कोणते व ते प्रात्यक्षिकाद्वारे नागली लाडू, नागली चकली करून दाखवली व मार्गदर्शन केले. कल्पेश दुधाळे डिआरपी ठाणे यांनी PMFME योजनेत प्रकल्प अहवाल तयार करणे आवश्यक कागदपत्रे कोणती या विषयावर माहिती दिली. शहापूर तालुक्यातील पायल डाळ मिल वहळोलीचे युवा उद्योजक कु. राहुल विशे यांनी स्वतः चा प्रक्रिया उद्योगातील अनुभव सांगितले. रविंद्र घुडे मकृअ, खर्डी यशस्वी यशाची वाटचाल या बाबतीत उपस्थितांना माहिती दिली. तर डि.एस. घोलप तंत्र अधिकारी, जिअकृअ कार्यालय,ठाणे यांनी उपस्थितांना सविस्तर PMFME योजना व्यक्तिगत/गट/कंपनी, पात्रता, अनुदान, बॅंक कर्ज या विषयावर मार्गदर्शन करताना उपस्थितांच्या प्रश्नांची शंका निरसनहि केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद दत्तात्रय कदम सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा शहापूर यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय गिरी कृषी अधिकारी, ताकृअ कार्यालय, शहापूर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन जितेश हरिभाऊ खांडगे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा शहापूर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील १०० हून अधिक शेतकरी, महिला व उद्योजक हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडताना तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शहापूर येथील कर्मचारी, सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच भातसा कंपनी, अंदाडचे संचालक राजेश गडगे यांचे सहकार्य लाभले.