खानापूर येथे हरभरा खरेदी शुभारंभ
देगलूर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे खानापूर येथील केतकी संगमेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या हरभरा खरेदी केंद्राचा महाशिवरात्रीच्या शुभदिनी प्रदेश भाजप दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र, भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य महाराष्ट्र रामदास पाटील सुमठाणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनाच्या हमी दराने नाफेडच्या माध्यमातून हरभरा व शेती मालाची खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना स्थानिक व हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना आपणांस विक्री करावयास झाल्यास ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जाते.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील खानापुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ऍड. रवि पाटील नरंगलकर, बालाजी पाटील पांडागळे, येरगीचे सरपंच संतोष पाटील, अनिल माळगे, खानापुरचे गौतम वाघमारे, बस्वराज पा.वन्नाळीकर, शिवकुमार ताडकोले, अनिल माळगे सचिन पाटील कारेगावकर, अरूण पाटील रामपूरकर, डाॅ. रविंद्र भालके, डॉ. सुनिल बालूरकर, संगमेश्वर बोधणे, संचालक मंडळ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.