महाराष्ट्र
न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अख्तर शहा यांची बिनविरोध निवड
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे आज पत्रकार सुष्टीचे जनक दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयतीनिमित्त प्रतिमा पुजन व नुतन कार्यकारिणी निवडीची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वानुमते एन.टी.न्युज व दैनिक पथदर्थी चे पत्रकार अख्तर शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आहिल्याबाई शाँपींग समोरील शासकीय रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत सुरूवातीला पत्रकार सुष्टीचे जनक, दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे छोटेखानी कार्यक्रमात प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी जमलेल्या सर्व पत्रकार बंधुनी फक्त अख्तर शहा यांची न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केली. उर्वरित कार्यकारिणी शुक्रवार रोजी आयोजित केलेल्या बैठकीत केली जाणार आहे.