शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंचच्या वतीने आयोजित भिल महासंमेलन पुर्वतयारी बैठक व जागेची पाहणी
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य वतीने राज्यस्तरीय भिल महासंमेलन 11 एप्रिल रोजी शिंदखेडा येथे विरदेल रोडवरील पटांगणात संपन्न होणार असून त्या पाश्वभुमीवर जनता हायस्कूल जवळ निवासस्थानी संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
वंचित भिल समाजातील लोकांवर अन्याय होत आहेत. विविध समस्यां, प्रश्न भिल समाज एकत्रित करणे आदी विषयांसह महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी भिल महासंमेलनाचे आयोजन असल्याचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी हयावेळी सांगितले. त्यानंतर संमेलन जागेची पाहणी पदाधिकारीनी केली. याप्रसंगी जिल्हासचिव अशोक सोनवणे, उपाध्यक्ष बापुजी फुले, संघटक भाऊसाहेब मालचे, जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, बळीराम निकुम शहादा, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, खजिनदार राजेश मालचे, गणेश सोनवणे, शिरपुर तालुकाध्यक्ष भोजु अहिरे, धुळे ग्रामीणचे एकनाथ ठाकरे, श्रीराम मोरे नरडाणा, जगदीश बागुल चिरणा, देविदास भिल दसवेल, महेंद्र मालचे चिलाणे, रामलाल ठाकरे, सारंगखेडा सुरेश सोनवणे, कडगाव रविद्र वाघ, पारोळा सोमा भवरे, किरण चित्ते , भरत पाटील शिंदखेडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.