गुन्हेगारीमहाराष्ट्र

गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक; धुळे पोलिसांच्या शोध पथकाची कामगिरी

धुळे (प्रतिनिधी) येथील ज्योती टॉकीजच्या बाजुला असलेले विजय व्यायमशाळेच्या समोर गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकनितीन देशमुख यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

याबाबत अधिक असे की, धुळे शहरात दिवाळी नववर्ष व आगामी सण उत्सव लोकांना निर्भय पणे साजरे करता यावे याकरीता पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने वेळोवेळी रात्रगस्त व कोबिंग ऑपरेशन धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने पो. निरी. नितीन देशमुख यांचे गोपनिय बातमीदाराने दिलेल्या बातमी वरुन धुळे शहर पोलीस ठाण्याचे शोध पथकातील अंमलदारांना त्यांचे दालनात बोलवुन कळविले की, आदित खिमशंकर भट्ट (वय २२ रा. मनमान जिन पाण्याच्या टाकी समोर धुळे) हा अंगात काळया रंगाचा टी-शर्ट (हुडी) व राखाडी रंगाची पॅन्ट परीधान केलेला इसम हा त्याचे कब्जात गावटी बनावटीचा पिस्तूल व जिंवत काडतुस सामान्या लोकांनामध्ये दहशत अगर काही तरी दखलपात्र अपराध करण्याच्या उददेशाने कब्जात बाळगुन आहे. या बाबत खात्री करून कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने शोध पथकाचे अंमलदार यांनी दोन पंचासह बातमीची खात्री करुन दि. ०९ जानेवारी २०२२ रोजी ००.०५ वाजता धुळे शहरातील ज्योती टॉकीजच्या बाजुला असलेले विजय व्यायमशाळेच्या समोर रोडवर आदित खिमशंकर भट्ट यास घेराव करुन ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेता त्याचे कमरेला डाव्या बाजुस एक पिस्तूल व पॅन्ट च्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतुस असे एकुण २६,००० रुपये किमंतीचे अनधिकृत शस्त्र कब्जात बाळगातांना मिळुन आला. याबाबत धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ व्हि.आर.भामरे करीत आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप वि.पो.अधि.दिनकर पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकनितीन देशमुख तसेच शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोहेकॉ/ विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, पोकॉ/ निलेश पोतदार, अविनाश कराड, तुषार मोरे, शाकीर शेख, प्रसाद वाघ यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे