महाराष्ट्र
रूईखेडा ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
रूईखेडा (शैलेश गुरचळ) दरवर्षी प्रमाणे आज ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सरपंच उषा गुरचळ यांनी पूजन केले.
त्यावेळी सोबत ग्रामपंचायत सदस्य जयश्री बंगाळे यांनी पुष्पहार अर्पण केला. ग्रामसेवक खीरोडकर आप्पा यांनी अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत उप सरपंच कालु वंजारी, सदस्य वासुदेव बढे, चंद्रकांत बढे, अतुल बढे, राजु बंगाले, हमीद वंजारी, अजय गुरचळ, दिनकर पाटील, सुरेश गुरचळ, सामाजिक कार्यकर्ते बंटी गुरचळ, कृष्णा पाटील, माणिक गवळी, कांता कदम आणि सर्व शिव प्रेमी तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित राहून अभिवादन केले.