शिंदखेडा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना, युवासेना, महिला आघाडीची महत्त्वाची बैठक संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यात आगामी दोंडाईचा व शिरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी, शिवजयंती, बुथप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती तसेच पक्षबांधणी या संदर्भात शिवसेना कार्यालयात आज दुपारी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांची आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीला सहसंपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी व शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी अनमोल मार्गदर्शन केले. शिवजयंती तसेच पक्ष बांधणी, बूथ प्रमुख व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा उपजिल्हा संघटक कल्याण बागल, जिल्हा संघटक डॉ.भरतसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटु पाटील, शहरप्रमुख संतोष देसले, तालुका संघटक डॉ. मनोज पाटील, स्थानिय लोकाधिकार समितीचे हिरालाल बोरसे, तालुका समन्वयक विनायक पवार, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, युवासेना जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी, तालुकायुवाधिकारी सागर पवार, मंगलसिंग भोई, राजु पाटील, रणजित पाटील, घनश्याम बोरसे, दिपक बोरसे, संतोष पाटील, भटु खंडेकर, नंदु दोरीक, राजेंद्र माळी, गोरख पाटील, जगदीश चौधरी, लोटन खैरनार, शिरपुरचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, तालुकाप्रमुख दिपक चोरमले, अत्तरसिंग पावरा, उपतालुका प्रमुख अभय भदाणे, युवासेना शहरप्रमुख अनिकेत बोरसे, वाजिद मलक, जितेंद्र राठोड, दिनेश गुरव, युवासेना तालुकाप्रमुख विजय पावरा, वाहतुक सेनेचे जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.