आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
येवती येथील जि.प.प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
बोदवड (सतिष बाविस्कर) आज तालुक्यातील येवती येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थींनीनी जिजाऊ माता वेषभूषा केलेल्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सरला साबळे यांनी प्रतिमा पूजन केले. राजमाता जिजाऊ विषयी इतिहास उजाळला. तदनतंर ईश्वर मंडावरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली. सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंध असल्याने निवडक विद्यार्थ्यांसमवेत जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडावरे यांनी केले. सदर कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली माळी व उपाध्यक्ष सुवर्णा माळी कार्यक्रमास उपस्थित होत्या.