भाजप चार राज्यांत विजयी झाल्याबद्दल हिरालाल मावस्कर यांचे नेतृत्वात विजयी रॅली काढून जल्लोष
अमरावती (महेंद्रसिंग पवार) भारतीय जनता पार्टी धारणी तालुका अध्यक्ष हिरालाल मावस्कर यांचे नेतृत्वात पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर व गोवा या चार राज्यात भारतीय जनता पार्टीचे भरघोष मतांनी विजयी झाल्याबद्दल भाजपा कार्यालयातून धारणी शहराचे मुख्य बाजार पेठपर्यंत विजयी रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला.
सदर विजयी रॅलीत भाजपाचे ज्येष्ठ नेता सुभाषजी गुप्ता, रामदासजी नालमवार, डॉ. सुरेन्द्र पटेल, अर्चना पटेल, नगर सेविका क्षमा चौकसे, नगर सेविका संगीता खार्वे, जिल्हा उपाध्यक्ष रेखा मावस्कर, रमेशजी मावस्कर, सुधाकर पकडे, माजी तालुकाध्यक्ष सदाशिव खडके, माजी तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, महामंत्री सुनिल लखपती, सचिव कमलेश जैस्वाल, सचिव तुलसिराम बेठेकर, प्रकाशजी मावस्कर, उदय तेजपाल पाल, उपाध्यक्ष मारोती गायन, शहराध्यक्ष सुशील गुप्ता, रामविलास दहिकर, पं.स. सदस्य महेंद्र धांडे, जयभय नवलाखे, महेश मालविय, अशोक मावस्कर, हरिराम सावलकर, सरपंच रमेश जावरकर, केशव सावलकर, राकेश जगताप, किसान आघाडीचे अध्यक्ष सुहास सालफडे, भटक्या जातीचे तालुकाध्यक्ष धोंडीबा मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष अंबर बन्सोड, जितेंद्र क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडी सदस्य गोपाल राठोड, बद्री सातनकर, राजु यादव इत्यादी नेत्या व शेकडोच्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते शामिल होते.