म्हसावद येथे गिरणा पात्रातुन ट्रॅक्टरने वाहतूक सर्रास सुरू महसूल विभागाकाचा कानाडोळा
जळगाव : तालुक्यातील म्हसावद गिरणा पात्रातील कानाकोपऱ्यातील मजूर लावून बारीक-सारीक रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. दिवसेंदिवस वाळूउपसा होणाऱ्या मुळे नदीचे पात्र खोल वर जाऊ लागले आहे. टप्प्या टप्प्याने दिवसभर रेतीचे भूगुल करायचा अन् साठा करून एकत्र आणून चढत्या भावाने रेती विकायची. अशी शक्कल लढवून नदी पात्रात वाळू साफ करण्याचे दिसुन येत आहे.
त्यात दिवसेंदिवस महागाईने सर्वसामान्यांचे डोके फोडले आहे. एखादी गरीब माणसाचे घरकुल बांधकाम काढले तर त्याला ग्रामीण भागात रेती मिळणे ही मुश्किल होते अन् श्रीमंताला दोन पैसे देवुन घर बांधणाऱ्याला सोपे जाते याबाबत कोणीही विचार करणारा दिसून येत नाही.
आता पावसाळा जवळ आल्याने वाळू माफिया न मध्ये ट्रॅक्टरने का होईना ”साठेबाजी की रेती ”अशी लढत. रेती नदीपात्रातून असून त्यांचा साठा करण्याची चढाओढ रेती तस्करांनी मध्ये लागले आहे. मग महसूल प्रशासन बघण्याची भूमिका का घेते. दिवसाढवळ्या होणाऱ्या वाळू उपसाला रोखू न शकणाऱ्या प्रशासनाला अपयश येण्याच्या मागचं कारण कागदा च्या गुलदस्त्यात असेल.
जिल्ह्याभरात धडाडीच्या कारवाया होताना दिसतात. अन् येथे स्थानिक प्रशासन वाळू ट्रॅक्टर वर कारवाईसाठी अपयश ठरत आहे. याबाबत प्रशासनाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
तरी संबंधित जळगाव तहसीलदारांनी तातडीचे पथक तयार करून कारवाई करण्याचे पुढाकार घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी कडुन केली जात आहे.