कुऱ्हाड खुर्द येथील मोहल्ला वस्ती परिसरात काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे मोहल्ला वस्ती परिसरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या मतदार संघाचे आमदार गिरीश महाजन यांच्या स्थानिक विकास निधीतून साडे सात लाखाचे हे काम मंजुर करण्यात आले आहे.
मुस्लिम मोहल्ल्यातिल या कामाचा शुभारंभ भाजप नेते संजय शांताराम पाटील, माजी जि.प. सदस्य संतोष चौधरी, भाजपा गंण प्रमुख कुऱ्हाड-गट जगदीश तेली, ग्रामपंचायत सदस्य अरुण बोरसे, ग्रा.प सदस्य सुधाकर महाजन, ग्रा.प.सदस्य इम्रान काकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात आली.
या शुभ प्रसंगी रज्जाक काकर, अनिल चौधरी, मुकुंदा सुरवाडे, पिंटू पहेलवान, सतीश देशमुख, राजु राठोड, पांडुरंग देशमुख, पवन शेजुळ, सोनू चौधरी, भगवान देशमुख, मधुकर माळी, रामदास देशमुख, महेंद्र बोरसे, गफ्फार काकर यांच्यासह कुऱ्हाड येथील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.