शिंदखेडा येथे शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेच्या प्रतीमेस जोडे मारून गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील शिवाजी चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व नेते संदिप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर आक्षेपार्ह विधान केतकी चितळे यांनी केल्याने हया महिलेच्या पुतळ्याची जोडे मारुन आणि गुन्हा दाखल करण्याबाबतचे पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय नेते, पद्मविभूषण आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार यांच्यावर केतकी चितळे नामक महिलेने ट्विटर, फेसबुक यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या लिखित संग्रहांची छेडछाड करत एक कविता पोस्ट करून आदरणीय पवार साहेबांचा अवमान केला असल्याचे दिसून आले आहे. पवार साहेब ज्यांची राजकारण व समाजकारणात लोकनेते म्हणून संपूर्ण हयात देशाच्या व राज्याच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, सिंचन व महिला धोरण अशा अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्राला विविध क्षेत्रात गती देऊन लोकविकासाचे ज्यांनी सातत्याने काम केले आहे. अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये देशाला पॅटर्न देणारे महाराष्ट्र राज्य ज्यांच्यामुळे ठरले ते आदरणीय पवार साहेब यांच्यावर विकृत विडंबन केतकी चितळे या महिलेने स्वतःच्या ट्विटर व फेसबुक हँडलवरून केलेले आहे. सदर महिलेने केलेल्या पोस्टमुळे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी यांच्यामध्ये तसेच उपहासात्मक कवितेमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा नामोल्लेख तसेच त्यांच्या साहित्याशी छेडछाड करून वारकरी संप्रदायामध्ये देखील नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
केतकी चितळेसारख्या विकृत माथेफिरूंनी भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी करू नये याकरीता तिचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदी सर्व हॅडल/पेज आपण कायमस्वरूपी बंद करावे अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी करीत आहोत. या आधीदेखील या महिलेने खालच्या पातळीवर जाऊन समाजमनाच्या भावना दुखावतील अशा वादग्रस्त पोस्ट स्वतःच्या सोशल मिडीया माध्यमातून केलेल्या आहेत. असे काहीतरी विधान करून सतत प्रसिद्धी मिळवायची आणि त्या माध्यमातून आपले हित साध्य करून घ्यायचे असा घाणेरडा व गलिच्छ हेतू ठेवून केतकी चितळे अशा प्रकारच्या पोस्ट कायम शेअर करीत असते. आमची आपणांस कळकळीची विनंती आहे की, तिच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून अटक करावी, जेणेकरून भविष्यात तिने अथवा कोणीही अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करतांना शंभर वेळा विचार करावा. त्याचप्रमाणे केतकी चितळे हिचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे की नाही हे देखील तपासून तिला योग्य उपचार देण्यात यावा. अशा प्रवृत्ती समाजाला घातक आहेत.
आज शिंदखेडा येथे छत्रपती शिवाजी चौफुली येथे केतकी चितळेच्या प्रतीमेस जोडे मारून निषेध नोंदविला.व शिंदखेडा पोलिस ठाण्यात केतकी चितळे विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ५०५(२), ५००, ५०२, ५०६, ५०१, ५०७, १५३ व आय.टी. ॲक्ट नुसार गुन्हा नोंदवावा व अशा प्रवृत्तींना आळा बसावा . पोलिस निरीक्षक सुनिल भाबड यांना करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे, महीला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पावरा, शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष दीपक जगताप, युवक जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, महीला तालुकाध्यक्षा ज्योती मराठे, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, मोती बापु, तालुका उपाध्यक्ष आनंदराव पाटील, लोहगाव सरपंच महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, ग्रं.सेलचे शहराध्यक्ष हर्षदिप वेंदे, देवीदास मोरे, राजेंद्र पाटील, डॉ संजय पाटील, चंदु पाटील, योगेश पाटील, यश आखाडे, विकी पाटील आदी उपस्थित होते.