आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सुमनताई इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी बांबरुड येथे विद्यार्थी परिचय मेळावा उत्साहात साजरा

तरुणांनी स्वामी विवेकानंदाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन भावी वाटचाल करावी : तहसिलदार कैलास चावडे

पाचोरा (प्रतिनिधी) पोतदार फाऊंडेशन संचलित, सुमनताई इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी, बांबरुड येथे विद्यार्थी परिचय मेळावा साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोरआप्पा पाटील, पाचोरा नगरअध्यक्ष संजय गोहिल, तहसिलदार कैलास चावडे,‍ शिवसेना उपजिल्हाअध्यक्ष ॲड. अभय पाटील, चावडे, धर्मसिंग राजपूत, संस्थेचे चेअरमन किशोर पोतदार, पोतदार, प्राचार्य.डॉ. मनोज पाटील उपस्थित होते.

तहसिलदार यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन भावी वाटचाल करावी असे संबोधीत करुन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले व त्यांना भावी शैक्षिणिक वाटचाली विषयी संबोधीत केले. तरुणांना कवितेतुन तरुणाईचा बोध ॲड.अभय पाटील यांनी दिला. कार्यक्रमाची सांगता तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करून केले. संस्थेचे अध्यक्ष किशोर पोतदार यांनी कोरोना काळात तालुक्याला जी मदत केली. याप्रसंगी त्यांचा ही गौरव आमदारांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रो. निखिल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच कार्यक्रमा प्रसंगी प्रो. जोत्सना पाटील, प्रो. करुणा जोशी, प्रो. कल्याणी कुंवर व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाची सांगता प्रो.सतिष बोरसे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करुन केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे