शिंदखेडा नगरपंचायत ३४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
नगरपंचायतीच्या इमारतीसाठी 70 लाख रुपयांची तरतूद
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील नगरपंचायतीच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर करण्यात आला आहे. यात ३४ कोटी २६ लाख ४५ हजार ३०८ रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात ४ कोटी ८२ लाख ९४ हजार महसुली उत्पन्न, १७ कोटी २३ लाख १५ हजार भाग भांडवली जमा आहे. तर प्रारंभाची शिल्लक १२ कोटी २० लाख ३६ हजार ३०८ ,अखेरची शिल्लक 2 लाख १६ हजार ४०८इतकी आहे असा अर्थसंकल्प नगरपंचायत चे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर व लेखापाल राजेंद्र बडगुजर यांनी सादर केला.
यावेळी नगरपंचायत नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे, गटनेते तथा नगरसेवक अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते अर्थसंकल्पात विरोधी व सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी काही सुचना केल्या होत्या.त्यात दुरुस्ती करुन अर्थसंकल्पात सर्वानुमते मंजूर करून सादर करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी सांगितले.
महसुली उत्पन्नात करा पासुन २ कोटी १९लाख ४६ हजार ५००, शासनाकडून मिळणारे अनुदान १ कोटी ९१ लाख ३५ हजार, इमारती व जागा, वाहन भाडे २७ लाख ८हजार ५००, फी व आकार उत्पन्न १८ लाख ६८ हजार, विक्री व भाडे २ लाख ५ हजार, व्याजपासून उत्पन्न १७ लाख, ठेवी उत्पन्न ५० हजार, व इतर उत्पन्न ६ लाख ८१ हजार आहे.
2022- 23 या आर्थिक वर्षात ५ कोटी ४ लाख ५५ हजार ९०० रुपये खर्च अपेक्षित आहे. यात आस्थापना खर्च २ कोटी ३२ लाख १४ हजार , प्रशासकीय खर्च १ कोटी ५१ लाख ६३ हजार, बँक आकार २० हजार, मालमत्तांची दुरुस्ती व परीक्षण ३५ लाख ८० हजार, व्यवहार व कार्यक्रम अंमलबजावणी खर्च ७ लाख ३० हजार, कल्याणकारी खर्च ९ लाख ५६ हजार ९०० व संकीर्ण खर्च ६७ लाख ९२ हजार इतका आहे.
अपंग कल्यांण व पुनर्वसन खर्च २ लाख १२ हजार ६००, दुर्बल घटक कल्याणकारी योजना खर्च, २ लाख १२ हजार ६००, महिला व बालकल्याण योजना खर्च२लाख १२ हजार ६००, क्रीडा क्षेत्रातील खर्च २ लाख १२ हजार ६००, विकास कामे अनुदान १७ कोटी २३ लाख १५ हजार तर विकास कामांवरील खर्च२९ कोटी १९ लाख ७३ हजार इतका अपेक्षित आहेत यात जमीन संपादन करणे ५० लाख, दुकान बांधकाम करणे ५० लाख, पाणी पुरवठा योजना १५० लाख, सिमेंट काँक्रेट रस्ते २५० लाख, पेव्हर ब्लॉक रस्ते १०० लाख,नगर पंचायत प्रशासकीय इमारत ७० लाख, नवीन बगीचा तयार करणे ५० लाख, भुयारी गटार टाकणे १०० लाख,सार्वजनिक संडास बांधणे ५० लाख, सार्वजनिक मुतारी बांधणे २० लाख, रमाई आवास ७०० लाख ,पंतप्रधान आवास योजना ३०० लाख,खुली जागा संरक्षण भिंत बांधणे १०० लाख,सामाजिक मंदिर बांधणे ५० लाख, इलेक्ट्रिक पोल टाकणे ४० लाख, एलईडी लाईट बसविणे ३० लाख आदी विकास काम खर्चाची तरतूद आहे .