अमळनेर

अमळनेर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) येथे थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे थोर स्वातंत्र्य सैनाणी यांच्या शहरातील मध्यवर्ती व रहदारीच्या सुभाष चौकातील पुतळा हा दुर्लक्षित असल्याचे लक्षात येताच “जेथे कमी तेथे आम्ही” या ग्रुप च्या सदस्यांनी तात्काळ सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची साफसफाई करून नेताजींच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले व अमर रहे अमर रहे नेताजी अमर रहे या जयघोषाने चौक दुमदुमून गेला. यावेळी थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला व “तुम मुझे खून दो ! मैं तुम्हे आजादी दूंगा !या त्यांच्या घोषनेने इतिहासातील ज्वलंत प्रसंगांना उजाळा मिळाला.

याप्रसंगी ग्रुपचे सदस्य माजी सैनिक राजेंद्र यादव, पत्रकार सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सौरव सोनवणे, गोटू रणदिवे, स्वप्निल जाधव, भीमराव पवार, विनोद देसाई, योगेश मिस्तरी विक्की, महाजन आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे