शिंदखेडा येथे भिल महासंमेलाच्या पाश्वभुमीवर महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित 11 एप्रिल रोजी भिल महासंमेलन संपन्न होत असून विषयावर तसेच नियोजन समितीवर निवड यासाठी संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राज्यस्तरीय पहिले भिल महासंमेलन होत असून शिंदखेडा सदर संमेलनाचा मान प्रथम मिळाला असून सदर संमेलनाची जय्यत तयारीत संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यासह पदाधिकारी व सदस्य, कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. प्रत्येक जिल्ह्य़ात तालुक्यात गावागावात जाऊन आमंत्रण पत्रिका देवुन संमेलनाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.त्यास वाढता प्रतिसाद मिळत आहे.तसेच सोशल मीडिया, फेसबुक, व्हाटसप वरुन उना र भाऊ उनारं भिल संमेलन उनारं हया अहिराणी बोली भाषेतील गिताने जनजागृती करण्यात येत आहे. सर्व महाराष्ट्र राज्य पिंजून काढण्यासाठी चंग बांधला असून महाराष्ट्र शासनाच्या लक्ष वेधून घेणारी हे भिल महासंमेलन यशस्वी करण्यासाठी वाढता प्रतिसाद लक्षात घेता दि.27 मार्च रविवार रोजी सकाळी अकरा वाजता जनता हायस्कूल जवळ दिपक अहिरे यांच्या राहत्या घरी नियोजन समितीची महत्वपूर्ण पदाधिकारी व सदस्याची बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीला सर्व पदाधिकारीनी उपस्थित राहण्याचे आवाहन भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व संस्थापक सदस्य यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.