१ जूनपासून केंद्राकडून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध
नवी दिल्ली : केंद्र सरकारने १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्राने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे आता सारखरेच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे.
या वर्षी देशात साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. परिणामी सारखेच्या दरात वाढ झाली होती. वाढत्या साखरेच्या दर कमी करण्यासाठी केंद्रसरकारतर्फे ३१ ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे. निर्यातीमुळे भाव नियंत्रणाबाहेर जाऊ लागले आहेत.
साखर निर्यातीच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. संपूर्ण जगात फक्त ब्राझील असा देश आहे, जो भारतापेक्षा जास्त साखर निर्यात करतो. अशा परिस्थितीत मोदी सरकारने साखरेवर बंदी घातली तर अनेक देशांसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.