शिक्षक भरतीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करा ; जनहित फाऊंडेशनच्या अध्यक्षकांची मागणी
बोदवड (सतीश बाविस्कर) शिक्षण भरती करण्यास २०१२ पासून सॉसत्यांना मनाई आहे मात्र राज्यातील अनेक शिक्षक स्वस्त त्यांनी बेकायदेशीर पळवाट काढून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून भरती केली. त्यामुळे सीईटी परीक्षा अभ्यासपूर्ण पद्धतीने देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी व संस्थाचालकांच्या संगनमताने आर्थिक भ्रष्टाचार करून फसवणूक केली आहे. यामुळे अशा सर्वांवर कारवाई करण्याची मागणी बोदवड येथील जनहित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बीड इंगळे यांनी केली आहे. तसे निवेदनही बोदवड तहसील कार्यालयात त्यांनी दिले आहे.
राज्यात सीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवंत धारक, हजारो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात असून गुणवंत धारक प्राधान्य असलेले शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परीक्षा पूर्ण होऊन प्रत्यक्ष यादी तयार करुन सर्वांचे गुणवत्ताधारक बेरोजगार युवकांची पुन्हा फसवणूक होणार आहे. असे निदर्शनास येते शासनाने शिक्षक भरतीसाठी परीक्षा ती परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या गुणवंत धारक उमेदवाराची यादी करून पारदर्शक पण त्यांना शिक्षकांच्या पदावर सामावून घेणार होती. पण प्रत्यक्षात मात्र मागच्या झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले अगदी युवकांचे अगदी नगण्य युवकांची नोकऱ्या मिळाल्या आहेत. यामुळे प्रामाणिकपणे कायद्याची बाजू राखणाऱ्या सर्वच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे फसवणूक झाल्यामुळे असंतोषाची भावना निर्माण झाली आहे यामुळे सर्वांची फसवणूक करून भरतीस कारणीभूत असणारा सर्वावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी इंगळे यांनी केली.