महाराष्ट्र
संत ज्ञानेश्वर महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा
सोयगाव (विवेक महाजन) अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र सोयगव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यावेळी मत मतदान व लोकशाही या विषयावर डॉ लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ शंतनु चव्हाण यांनी समारोप केला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी गौरव वाघ, सुनील साळुंके, कुणाल गव्हाणे, बबलू वाघमारे, सुनील साळुंखे आदी उपस्थित होते.