आजचे राशिभविष्य, शुक्रवार ८ एप्रिल २०२२ !
मेष :- वेळेशी स्पर्धा करताना महत्त्वाच्या माणसांना विसरू नका. जी माणसं तुमच्या पाठीशी कायम उभी राहतात, ज्यांच्याशी तुम्ही बराच काळ बोलला नाही आहात, तसंच ज्या व्यक्तींचं तुमच्या आयुष्यातलं स्थान महत्त्वाचं आहे, अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करू नका. नवी असाइनमेंट किंवा काँट्रॅक्ट मिळू शकेल आणि सेलिब्रेशन होईल.
वृषभ :- स्वतःचा ठसा उमटवावा, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असं स्वप्न तुम्ही पाहात आहात. आता तुम्हाला मोठी असाइनमेंट मिळण्याची शक्यता असून, त्याचं सुपरव्हिजन तुम्ही करण्याची गरज आहे. तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता आहे आणि तुमचं खूप कौतुक होईल.
मिथुन :- अनेकदा तुम्ही उदारपणे वागता; मात्र काही तरी गैरसमज होतात. संवादामध्ये तात्पुरत्या स्वरूपात काही समस्या असू शकतील. तुमच्या फॅक्ट्स स्पष्ट ठेवा. त्यांचा आढावा घ्या आणि त्या ऑर्गनाइज करा.
कर्क :- नवी परिस्थिती, कामातली आव्हानं आणि उघडकीला आलेल्या काही धक्कादायक गोष्टी यांमध्ये तुम्हाला हरवून गेल्यासारखं वाटू शकेल. तुम्ही शांतपणे आत्मचिंतन केलं पाहिजे. तुमच्याभोवती असलेल्या माणसांचे खरे हेतू जाणून घेतले पाहिजेत. शक्य असल्यास एखादा शॉर्ट ब्रेक घ्यावा.
सिंह :- एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला तुमच्याकडून एखादी मदत अपेक्षित असू शकते. कितीही छोटी असली, तरी ती मदत करा. आजच्या दिवसात काही काळासाठी तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. तुम्हाला असंही लक्षात येऊ शकतं, की तुम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी होत नाही आहेत.
कन्या :- एखादी संधी तुमचं लक्ष वेधून घेऊ शकेल. त्यामुळे योग्य वेळी तुम्हाला दिलासा मिळेल आणि परिस्थिती हाताळण्यासाठी आर्थिक व्यवस्थाही होईल. तुमच्या कामाच्या बाबतीत सकारात्मक बदल होऊ शकतो. नवं फिटनेस रूटीन तुम्हाला हवे असलेले रिझल्ट्स देऊ शकेल.
तुळ :- दिवस काहीसा घाईघाईत सुरू होऊ शकतो आणि बरंच काम साठेल; पण तुम्ही प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामं करावीत आणि बाकीची शिल्लक राहू द्यावीत. चांगल्या मनोवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला चांगला पाठिंबा/सहकार्य मिळू शकतं. घरगुती मुद्दे तूर्तास मागे ठेवले जाऊ शकतात.
वृश्चिक :- तुम्हाला खूप स्पर्धा करावीशी वाटेल, काहीशी जेलसी, म्हणजेच ईर्ष्याही वाटेल; मात्र तुम्ही ती भावना नियंत्रणात ठेवायला हवी. कारण अन्य कोणीही त्याचं मूल्यमापन करू शकतात. स्वतःला नियंत्रणात ठेवावं, तोल ढळू देऊ नये. वैद्यकीयदृष्ट्या काही अस्वस्थता वाटत असेल, तर डॉक्टरांशी चर्चा करावी.
धनु :- असं दिसतंय, की तुमच्या प्रार्थनेला एकामागून एक उत्तर मिळू लागली आहेत. एखाद्या मुद्द्याच्या पूर्ण आशा तुम्ही सोडून दिल्यानंतर पुन्हा ती निर्माण होत असल्याचं दिसत असेल. तुमच्या आईला काही मदत आणि सहकार्याची, पाठिंब्याची गरज असू शकेल. अति खर्च करण्याच्या तुमच्या सवयीला पायबंद घालावा.
मकर :- कोणी तरी दुरून तुमच्या क्षमतेचं कौतुक करत आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. तुम्ही जे काही करत आहात, ते करत राहा. त्यावर पुनर्विचार करू नका. तुम्हाला नोकरी बदलायची इच्छा झाली असेल, तर त्यासाठी आताची वेळ योग्य आहे.
कुंभ :- तुम्हाला काळजीच्या काही गोष्टींबद्दल आतून काही वाटेल, इन्ट्यूशन्स होतील. तुम्ही विचार करताय, ते कदाचित खरं असू शकेल. ज्या व्यक्ती तुमच्याकडे मदत मागतात त्यांना ती करणं सुरू ठेवा. तुम्ही आधीच ओळखत असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल काही कालावधीनंतर रोमँटिक भावना निर्माण होऊ शकतात.
मीन :- गेट-टुगेदर, सेलिब्रेशन आदींच्या माध्यमातून एखादा छोटा सोहळा अनुभवाल. एकंदरीत वेळ चांगला व्यतीत होईल. जवळच्या व्यक्तींच्या ग्रुपसोबत ट्रिप चांगली ठरू शकेल. तुम्ही पैसे उसने दिलेली एखादी व्यक्ती आता कदाचित ते परत करण्याच्या स्थितीत असू शकेल.