धुळे जिल्हा संपर्क प्रमुखपदी स्पीड न्युज चे निवासी संपादक प्रदीप गोसावी यांची नियुक्ती !

धुळे (प्रतिनिधी) धुळे जिल्हा संपर्क प्रमुखपदी स्पीड न्युज चे निवासी संपादक प्रदीप गोसावी यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीने नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्रकही प्रदीप गोसावी यांना देण्यात आले.
ग्राहक संरक्षण समिती भारतभर कार्यरत आहे. ग्राहक संरक्षण कल्याण हक्क कायदा १९८६/२०१९ द्वारे तुमची तुमच्या क्षेत्रात काम करण्यासाठी नियुक्ती केली जात आहे. ग्राहक व्यवहार, कायदेशीर ज्ञान, सामाजिक कार्य आणि स्व-इच्छा या बाबी लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांच्या संमतीने तुमची धुळे जिल्हा संपर्क प्रमुखपदी दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत नियुक्ती करण्यात येत आहे. ‘जागो ग्राहक जागो’, ही संज्ञा तुम्हाला तुमच्या जिल्हा, तहसील, बार्ड, गावपातळीवर शाखांच्या उभारणीसाठी स्वेच्छेने काम करणाऱ्या जिज्ञासू, कायदेविषयक जाणकार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देत आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
ग्राहक संरक्षण समितीतर्फे सर्व शासकीय, शासकीय, खाजगी सहकारी क्षेत्रातील कायदेशीर कामे करण्यासाठी प्रशिक्षण व शिबिराच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. आपण ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य व पदाधिकारी वाढविण्याचा प्रयत्न कराल अशी आशा या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
ह्या निवडी बद्दल प्रदीप गोसावी यांचे अभिनंदन स्पीड न्यूज चे मुख्य संपादक अशोराज तायडे यांनी केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



