कै. बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी सहकारी पतसंस्थातर्फे रमेश जावळे यांचा सत्कार
सोयगाव : सोयगाव शहरातील गजानन महाराज परीवाराचे भक्त रमेश हरी चौधरी हे गेल्या पाच महिने पंधरा दिवसा पासून पायी नर्मेदा परीक्रमा पूर्ण करून त्याचे सोयगाव शहरातील कै. बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगावच्या वतीने गजानन महाराज भक्त रमेश हरी चौधरी यांचा शाल, श्रीफळ, फुल गुच्छ देऊन पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आले.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन मंजुळाबाई चंद्रास रोकडे, चंद्रास रोकडे, संचालक दिलीप बिर्ला, दत्तू देसाई, कृष्णा राऊत, योगेश बोखारे, राजू एलीस, बाबु चव्हाण, समद शहा तुराब शहा, पतसंस्थेचे मॅनेजर सिताराम गोतमारे, लिपीक कृष्णा शेवाळकर, आदीसह उपस्थित होते. तसेच गावात आगमन झाले त्यावेळी त्याचें गजानन भक्त परिवार, चौधरी- जावळे परिवार व विविध समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येऊन टाळ मुर्देगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व स्वागत करण्यात आले होते. पायी नर्बेदा परीक्रमा पूर्ण करून आल्या निमित्त उद्या दि. १६ गुरूवार रोजी गजानन महाराज मंदिर सोयगाव येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सोयगाव-आमखेडा परिसरातील नागरिकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.