शिंदखेडा येथे भाजपाच्या वतीने प्रविण चव्हाण व अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील मुख्य शिवाजी महाराज चौकात तालुका भाजपाच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात खोटे षडयंत्र रचुन बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारी वकील प्रविण चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन भाजप जिल्हा ध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतिनिधी कामरान निकम, तालुकाध्यक्ष, गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी षडयंत्र रचणाऱ्या विरोधात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर घोषणा बाजी केली. तसेच प्रतिमेला जोडे मारणयात आले.जिल्हाध्यक्ष नारायण पाटील म्हणाले की, माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल हे मतदारसंघात विविध विकास कामांसाठी तत्पर नेते त्यांच्या कार्यशैली सहन होत नाही.म्हणुन विरोधक खोटे षडयंत्र रचुन बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.ते कदापी आम्ही सहन करणार नाहीत. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी सभापती भरत पवार, उपसभापती बल्लु माळी, नगरपंचायत उपनगराध्यक्ष भिला पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश नागो देसले, शहराध्यक्ष प्रविण माळी, रेल्वे प्रवासी आघाडी तालुकाध्यक्ष दादा मराठे, नगरसेवक किसन सकट, अॅड.विनोद पाटील, चेतन परमार, जितेंद्र जाधव, अर्जुन भिल, राजेंद्र बोरसे, गणेश खलाणे आदी पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस स्टेशनचे एपीआय प्रशांत गोरावडे, पीएसआय रविंद्र केदार यासह पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.