आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने धुळे तालुक्यात रस्त्यांसाठी ३५ कोटी ७५ लक्ष रुपये निधी मंजुर
धुळे (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना चालना मिळावी आणि येथील जनतेचा प्रवास सुकर व्हावा म्हणून आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी एकूण ३५ कोटी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार आहेत. आज दि. ११ मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे तालुक्यात रस्त्यांची कामे व्हावी आणि खराब झालेली रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांच्या वारंवार बैठका घेवून रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार तालुक्यातील रस्ते सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदर कामांना मंजुरी मिळावी आणि त्यांचा अर्थसंकल्पात समावेश व्हावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी वारंवार मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी एकूण ३५ कोटी ७५ लक्ष रुपये मंजुर करण्यात आले आहेत. त्यासाठी दि. १९ मार्च रोजी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
असे आहेत मंजुर रस्ते धुळे ते बिलाडी रस्ता सुधारणा करणे (१ कोटी ३० लक्ष रु), कौठळ फाटा ते कापडणे रस्ता सुधारणा करणे (२ कोटी १५ लक्ष रु.), बाबरे ते जळगाव हद्द दरम्यान स्लॅबड्रेनचे बांधकाम करणे (२कोटी ५० लक्ष रु.), कापडणे ते कौठळ रस्ता सुधारणा करणे (३ कोटी लक्ष (रु.), कौठळ फाटा ते तालुका हद्द (३ कोटी ५० लक्ष रु.), मोहाडी रानमळा मोघण कुळथे ते जिल्हा सिमेपर्यंत रस्ता सुधारणा करणे (३कोटी लक्ष ५० हजार रु.), वेल्हाणे ते शिरुड रस्ता सुधारणा करणे (७६ लक्ष रु), शिरडाणे प्र. डा. ते नावरा रस्ता सुधारणा करणे (२ कोटी २८ लक्ष रु.), धमाणे ते बिलाडी रस्ता सुधारणा करणे(१ कोटी ९० लक्ष), बिलाडी ते निमखेडी रस्ता सुधारणा करणे (२ कोटी ८५ लक्ष रु.), बोरकुंड ते झोडगे रस्ता सुधारणा करणे (२ कोटी ८५ लक्ष रु.), मोहाडी प्र. डा. ते जिल्हा हद्दपर्यंत रस्ता सुधारणा करणे (९५ लक्ष रु.), निकुंभे ते निमडाळे रस्ता सुधारणा व लहान पुल, पाईप मोरींचे बांधकाम करणे (२ कोटी ८५ लक्ष रु.), नावरा गावादरम्यान रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (२कोटी १८ लक्ष ५० हजार रु.), मांडळ गावात काँक्रीट रस्ता करणे (२ कोटी लक्ष रु.) या रस्त्यांचा समावेश असून या निधीतून नादुरस्त झालेल्या रस्त्यांचा भाग दुरुस्त करण्यात येणार आहेत. रस्त्यांची कामे मंजुर करून दिल्याबद्दल आ. कुणाल पाटील यांचे तालुक्यातील जनतेने आभार व्यक्त केले आहेत.