महाराष्ट्र
मालपुर येथे भगवान विर एकलव्य जयंती उत्साहात साजरी
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर येथे भगवान विर एकलव्य जयंती व प्रतिमा पुजन करण्यात आले व सकाळी प्रतिमा येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले व दुपारी आदिवासी टायगर सेना च्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.
प्रतिमा पुष्पहार अर्पण करतांना महावीर सिंह रावल, उपाध्यक्ष जि.प. तथा जिल्हा परिषद सदस्य धुळे मच्छिंद्र शिंदे, सरपंच मालपुर संतोष भावराव चव्हाण, उपसरपंच मालपुर आदिवासी टायगर सेना धुळे जिल्हाध्यक्ष किशोर ठाकरे, विठ्ठल सोनवणे, आदिवासी टायगर सेना शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष विजय मालचे दोंडाईचा शहरप्रमुख लालेश पवार यांच्या उपस्थितीने कार्यक्रम घेण्यात आला व ४ वाजता संपुर्ण मालपुर गावात वाजत गांजत मिरवणुक काढण्यात आली. किशोर ठाकरे आमचे मार्गदर्शक यांच्या आदेशानुसार आदिवासी टायगर सेनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.