शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात दूषित पाणीपुरवठ्याबाबत मुख्यधिकाऱ्यांना निवेदन !
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील दोंडाईचा शहरात 5/6 दिवस झालेत गावभाग, गणपती मंदिर परिसर, पिंपळ चौक, आझाद चौक, रावळ नगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होण्याबाबत शिवसेनेच्या वतीने आणि नागरिकांतर्फे नगरपालिकेत मुख्याधिकारी सावंत यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करून दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा यासंदर्भात मागणी करण्यात आली.
दोंडाईचा शहरात 36 कोटी खर्च करून फिल्टर पाणी योजना सुरू करण्यात आली त्यामुळे संपूर्ण शहराला शुद्ध व फिल्टर पाणी मिळेल असे सर्वसामान्य दोंडाईचा करांना वाटत होते परंतु पाणी पुरवठा योजना मध्ये बिघाड झाला की काय सहा-सात दिवस झाली पिवळे पाणी, निळे पाणी, पाण्यामध्ये नळा वाटून कोंबडी चे पीस येणे असले प्रकार सहा सात दिवस झाले गाव भाग, पिंपळ चौक, गणपती मंदिर परिसर, आझाद चौक, राऊळ नगर परिसरात होत असून याबाबत संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची तसेच पाण्याच्या टाकीची तपासणी करण्यात येऊन नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या तर्फे निवेदन देऊन करण्यात आली. कोट्यावधी खर्च करून पाणी पुरवठा योजना सुरु झाली असली तरी ती सुरळीत होत नसल्याने नळा वाटून कोंबडी चे पीस येणे, पिवळे पाणी येणे, निळे पाणी येणे आणि दुर्गंधीत पाणी येऊन नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत पाणी पुरवठा विभाग व मुख्याधिकारी यांनी व्यक्तिगत लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व दूषित येणारे पाणी त्वरितत थांबविण्यात यावे याबाबत शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी माजी नगरसेवक राकेश पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख शैलेश सोनार, संघर्ष समितीचे सुहास साठे, प्रदीप गुरव, आबा चित्ते, अमोल कापडणे कर, कैलास पाटील, शिवा मराठे, युवा सेना शहर प्रमुख सागर पवार, सिद्धेश साठे, आकाश पाटील, गोलू पाटील, भूषण ठाकूर, कुणाल सोनार, विकी पाटील, बाळा पाटील, कृष्णा शिंपी, ओम सोनार, योगेश गुरव यासह अनेक नागरिक उपस्थित होते. याबाबत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असे शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश सोनार, आबा चित्ते, सागर पवार यांनी सांगितले. त्यावेळी सुभाष साठे यांनी पाणी पुरवठा योजना 36 कोटी खर्च करून केली असली तरी योजना सुस्थितीत केली आहे का ?याबाबत प्रश्न उपस्थित केला.