शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कामाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी
डॉ. आंबेडकर चौकात उभारण्यात येणार डॉ. आंबेडकर आणि छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सिल्लोड येथील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वाराच्या कामाची संयुक्त पाहणी केली. त्यासोबतच औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तर येथील न.प.च्या ओपन स्पेन मध्ये भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात जागेची पाहणी करण्यात आली.
शहरात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वाराचे काम शिवजयंती पूर्वी पूर्ण करण्यात यावे , काम दर्जेदार व गुवतापूर्व व्हावे यासाठी विशेष काळजी घेवून निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे सोबतच औरंगाबाद – जळगाव महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. आंबेडकर आणि छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा उभारण्यासंदर्भात कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करीत यासाठी तातडीने सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिले.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र (बापू) पाटील, संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, विशाल जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, युवासेनेचे अक्षय मगर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, रवी गायकवाड, रामसेट कटारिया, आर्किटेक्ट प्रशांत परदेशी, ईश्वर तसेवाल, उदय तायडे , नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अझहर पठाण, प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण , राजुसेट कटारिया, शिवाजी गायकवाड आदींची उपस्थिती होती.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक सिल्लोड येथूनच जातात. त्यामुळे शहरातील औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा तसेच याच ठिकाणी नगर परिषदेच्या ओपन स्पेस मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वरूढ पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. त्याअनुषंगाने या जागेची देखील पाहणी करून येथे भव्य पुतळा सह पर्यटकांचे लक्ष वेधेल असे नयनमोहक सुशोभीकरण काम करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या.
सिल्लोड शहरात छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. सदरील पुतळे हे जुन्या गावात असून रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर आहे. नागरिक व जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ ही मुख्य रस्त्याने असल्याने नगर परिषदेच्या माध्यमातून औरंगाबाद – जळगाव महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समोरासमोर पुतळे उभारण्याचे विचाराधीन होते. यासाठी कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करून लगेच या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
-राज्यमंत्री अब्दुल सत्तार