शिंदखेडा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी नगरपंचायतला भाजपा प्रवासी आघाडीचे निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जाणारा विरदेल रोड व वरपाडे चौफुली म्हणुन ओळखला जातो. परंतु आजपर्यंत या शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा यासाठी शिंदखेडा तालुका भाजपा प्रवासी आघाडीच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना प्रवासी आघाडीचे अध्यक्ष दादा मराठे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
निवेदनातून शहरातील लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन स्टेशन रोड येथील मनोहर एन एक्स दुकानाजवळील नगरपंचायतची आरक्षित असलेली जागेवर शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष रजनी अनिल वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे व मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा प्रवासी आघाडीचे अध्यक्ष दादा मराठे, भुषण पवार, हर्षल शिंदे, राजेंद्र मराठे, युवराज माळी, राकेश महिरे, राहुल बडगुजर, प्रवीण मराठे, भरत मराठे, सचिन बडगुजर, विशाल बडगुजर, सदानंद मराठे, वासुदेव बागुल, दिपक चौधरी, संजय पहाडी, महेंद्र चौधरी, संदीप पाठक, देविदास मराठे, अनिल मराठे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.