अल्पसंख्यांक विकास निधीतून देवपूर कब्रस्थान, मोगलाई कब्रस्थान आणि जलालशाह कब्रस्थान साठी ९५ लक्ष मंजूर
धुळे (प्रतिनिधी) दि.२४-१२-२०२१ धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांच्या विशेष प्रयत्नाने देवपूर कब्रस्थान, मोगलाई कब्रस्थान आणि जलालशाह कब्रस्थान येथे अंतर्गत रस्ते, पथदिवे आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी अल्पसंख्यांक विकास निधीतून ९५ लक्ष चा भरीव निधी राज्याचे अल्पसंख्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंजूर केला आहे.
विधान मंडळाच्या अधिवेशन काळात धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी अल्पसंख्य विकास मंत्री ना. नवाब मलिक यांची भेट घेवून धुळे शहरातील मुस्लीम समाजाच्या पुरातन व मुख्य कब्रस्थानातील गैरसोयींबद्दलची व्यथा मांडली. देवपूर कब्रस्थान,मोगलाई कब्रस्थान आणि जलालशाह कब्रस्थान मध्ये अंतर्गत रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधा नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती.यासर्व अडचणी लक्षात घेवून आ. फारूक शाह यांच्या मागणीचा विचार करून ना.नवाब मलिक यांनी देवपूर कब्रस्थानसाठी २५ लक्ष, मोगलाई कब्रस्थानसाठी ३० लक्ष आणि जलालशाह कब्रस्थानसाठी ४० लक्ष चा निधी अल्पसंख्यांक विकास निधीतून तत्काळ मंजूर केला आहे. याबाबत धुळे शहरातील अल्पसंख्यांक समाजामध्ये समाधान व्यक्त होत व आमदार फारूक शाह यांच्य सत्कार करण्यात आला. यासीन पठान मजर, मिर्ज़ा रीजवान, सैयद असलम खाटीक, अमजद पठान, आबिद शाह आदी उपस्थित होते.