फॅक्टरीतील तीष्या उबाळे बालिकेने स्केटींग मध्ये केला जागतिक विक्रम
मे महिन्यात थायलैंड येथे घेणार सहभाग
वरणगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरीतील रहिवाशी तिष्या देवानंद उबाळे या १३ वर्षीय बालीकेने स्केटिंग मध्ये एक तासात सलग दहा इव्हेंट स्केटींग मध्ये करून जागतिक विक्रम केला आहे. या स्पर्धेत भारतभरातून ७५९ स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता.
जागतीक स्तरावर हा पहीलाच विक्रम आहे. ऑल वर्ल्ड मल्टीपल इव्हेन्ट आर्गनायझेशन ने स्केटींग स्पर्धा ऑन लाईन पद्धतीने भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तिष्या ने हे यश संपादन केले आहे. तिला या यशासाठी जागृती काळे यांचे मार्गदर्शन लाभले. तिला शील्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. तिष्या हिने आता पर्यत औरंगाबाद, गोवा, नागपूर, मुंबई, जळगाव, भुसावळ या ठिकाणी स्केटींगच्या वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन मैडल मिळवली आहेत. शालेय स्पर्धा, जिल्हास्तरीय, राज्य ते नेशनल लेव्हल पर्यंत फक्त आठ महीने वरणगाव फॅक्टरी, जळगाव येथे सराव तीने आपला प्रभावी खेळ दाखवीला आहे. आता ती मे महीन्यात थायलैंड ला होणाऱ्या आर्सेक एशिया स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या जागतिक किर्ती च्या यशा बद्दल तिष्या चे परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे .