सावखेडा सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात ; चेअरमनपदी शिवसेनेचे पंडित गोरे तर व्हाईस चेअरमनपदी प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड
नवनिर्वाचित चेअरमन व सदस्यांचा सेना भवन येथे सत्कार
सिल्लोड (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा खुर्द व बुद्रुक विविध सहकारी सोसायटीवर शिवसेनेचे बिनविरोध वर्चस्व प्रस्थापित झाले असून चेअरमन पदी शिवसेनेचे पंडित कडूबा गोरे तर व्हाईस चेअरमन पदी प्रताप नामदेव शेळके यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित चेअरमन व सदस्यांचा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे गुरुवारी शिवसेना सचिव खासदार विनायकराव राऊत, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन पंडित गोरे, व्हाईस चेअरमन प्रताप शेळके, धनाजी पा. गोंगे, जितेंद्र तांबे, बाळासाहेब गोरे, अशोक साळवे, लताबाई गोंगे, यांच्यासह उपसरपंच काशीनाथ गोरे, माजी उपसरपंच कैलास शेळके , लक्ष्मण गोंगे, गणपत गोरे, भीमराव राकडे, पंडित सोनने, विठ्ठल भोजने, ज्ञानेश्वर खंडाळकर, बाळा पांढरे, लक्ष्मीबाई गोंगे, दत्तू गोरे, लक्ष्मण गोरे, पुंडलिक गोंगे आदींची उपस्थिती होती.