Horoscope : आजचे राशिभविष्य, सोमवार १६ मे २०२२२ !
मेष : व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नोकरीत यश मिळेल. थोडासा ताण तणाव जाणवेल.
वृषभ : मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शुभ दिन. व्यापार व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता.
मिथुन : व्यवहार करताना जोखीम पत्करू नका. कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका.
कर्क : घरात पाहुण्यांचे आगमन होईल. मोठे काम करण्याची संधी मिळेल. अन्नदान करा.
सिंह : जिभेवर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यात मन लागेल. नोकरीत यश मिळेल.
कन्या : व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता.
तूळ : शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून लाभ मिळण्याची शक्यता. शत्रू मागे हटतील. कुठल्याही प्रकारची घाई धोकादायक ठरेल.
वृश्चिक : उत्पन्न स्थिर राहील. रोजगार मिळण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.
धनु : व्यापार आणि व्यवसायात यश मिळेल. वाहन किंवा कुठलीही मशीन वापरताना काळजी घ्या. नव्याने आर्थिक नियोनज करावे लागेल.
मकर : नोकरीत उच्चअधिकार मिळण्याची दाट शक्यता. बोलण्यावर ताबा ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ : जोडीदाराचा सहवास लाभेल. मित्रांचा सहवास लाभेल. कौटुंबिक समस्या वाढल्याने चिंता वाढेल.
मीन : वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. प्रयत्न केल्यास यश मिळेल. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता.