दाभा येथे क्रिडांगण उदघाटन सोहळा संपन्न
बाभूळगाव (कपिल घावडे) बाभूळगाव तालुक्यातील दाभा, येथे क्रिडाप्रेमी युवकांच्या संकल्पनेतुन मुलांकरिता व युवकांकरिता कबड्डी व इतर मैदानी खेळांसाठी अपार मेहनतीतुन क्रिंडागण तयार करण्यात येऊन गेल्या ४ महिन्यापासुन त्यावर कबड्डी व इतर मैदानी खेळ सुरू आहेत.
त्याबाबत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंती पर्वावर अधिकृतपणे उदघाटन सोहळा व खेळाडुंसाठी “काशिमाया व्हेंचर प्रा.लि.”चे अमोल सार्वे यांच्याकडुन ३० खेळाडूंना क्रिडा गणवेश किटचे वाटप करण्यात आले.
अनंतराव कडव यांचे अध्यक्षतेखाली तर उदघाटक म्हणुन बाभुळगांवचे तहसिलदार कुमरे तथा प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक डांगे होते. सोबतच सरपंचा वंदना दोळंगे, उपसरपंच राजू लोखंडे, ग्रा.पं.सदस्य रंजन ठवकर, पंचबुध्दे तसेच दाभा येथील मान्यवर गावकरी हजर होते. पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या मार्गदर्शनातुन दाभा येथील युवकांचे कौतुक करण्यात येऊन राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू या मैदानावरून घडुन एक सुदृढ समाज घडावा असा उदघाटनीय भाषणातून व्यक्त केला.
तर विशेष करून अमोलच्या सामाजिक कार्याचे कौतूक करून असेच प्रेरणादायी कार्य त्यांचे हातुन घडो असे सांगण्यात आले. क्रिडांगण आणी सदर कार्यक्रमासाठी निलेश फटे व त्यांचे सहकारी यांनी भरघोस योगदान दिले.
यावेळी शुभम गाढवे, सुभाष ठवकर, सचिन कुकडे, गौरव कावलकर, संकेत कावलकर, गौरव ठवकर, श्रीराम अथिलकर, भिमराव मुलुंडे, गाढवे, दिनेश भडके, संजय चोले, रविंद्र काळे, सुदाम बोंद्रे, अजय चोले, अशोक बोंद्रे व दाभा येथील गणमान्य गावकरी बांधव-भगिनी हजर होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत गाढवे यांनी तर आभारप्रदर्शन आकाश मुलुंडे यांनी केले.