पोलीस जर चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर ते वसुलीच करणार ; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
मुंबई (प्रतिनिधी) राज्याचे हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजत असून चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. राज्यातील पोलीस दलात सुरु असलेल्या बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती राज्याच्या गृह सचिवांना दिली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोप विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी केला. पोलीस जर चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर ते वसुलीच करणार असा आरोपही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मागील दोन वर्षात अनेक खंडणी प्रकरणे समोर अली आहेत. पोलीस दलाची अवस्था सुधारली गेली नाही तर हे पोलीस दल सर्वोत्तम दल म्ह्णून ओळखलं जाणार नाही. बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती मी होम सेक्रेटरीला दिली होती. परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तो अहवाल फोडला आणि माध्यमाना दिला. जर पोलीस चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर आपोआप ते वसुलीच करणारच.”