तूपशेळगाव येथील मारहाणीतील चार आरोपींचा जामीन मंजूर
देगलूर (प्रतिनिधी) तालुक्यातील तूपशेळगाव येथील शेजारी शेजारी असलेले, रस्त्यावर खुटा मारून जनावरे बांधण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जबर मारहाण झाली होती. त्यात दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले होते. सदरील प्रकरण पोलीस स्टेशन ला पोहचले आणि एकमेका विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
त्यात आरोपी विरुद्ध भा. द. वि.307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सदरील आरोपींना दिनांक 07 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. पाच दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर सदरील आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या अटकेविरुद्ध जामीन मागण्यासाठी आरोपींच्या नातेवाईकांनी ॲड. अविनाश सूर्यवंशी कावळगावकर यांच्या मार्फत बिलोली येथील सत्र न्यायालयात जमिना साठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदरील भा.द.वी 307 मधील चारही आरोपींचा जामीन मंजुर केला. आरोपीच्या बाजूने ॲड सूर्यवंशी कावळगावकर यांनी बाजू मांडली.