शिंदखेडा तहसील कार्यालयाजवळ तहसीलदार पत्नी वैशाली सैदाणे यांच्या दोन मुलांसह न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण
शिंदखेडा : येथील तहसील कार्यालयासमोर एक मे आजपासून विद्यमान तहसीलदार सुनील सैदाणे यांच्या धर्मपत्नी सौ. वैशाली सुनील सैदाणे व मुलगी अनधा सुनील सैदाणे (वय-19), मुलगा आदित्य वर्धन सुनील सैदाणे (वय- 13) आपल्या मुलासह न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. आज पहिल्याच दिवशी उपोषण करर्याना काल रात्रीपासून साधा मंडप देखील लावु देत नव्हते. दडपशाहीचा कळस गाठुन मंडप मालकांना फोनवर धमकवण्यात आले. जर कोणी मंडप लावला तर गुन्हा दाखल केला जाईल असे तहसील कार्यालयाकडुन धमकी दिली गेली.
गेल्या दिवसांपासून तापमानाचा पारा चढला आहे म्हणून लहान मुलांना धरुन उन्हात कसे बसणार हे शहरातील वंचित आघाडीच्या राहुल पाटोळे यांच्या पदाधिकारी च्या हिमतीने अखेर छत्रछाया उभी करून दिली. हयापुर्वीच उपोषण कर्त्या सौ. वैशाली सुनील सैदाणे यांनी पोलिस महाअधिक्षक नाशिक व उपायुक्त सह सर्वच विभागांना उपोषणाला बसणार असे निवेदन दिले होते.त्या निवेदनाद्वारे शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील महादु सैदाणे व त्यांची रखेल पत्नीचा दर्जा दिलेली मीना अशोक घोडके उर्फ मीना दिलीप मिश्रा व ओमकार दिलीप मिश्रा उर्फ हर्षवर्धन सुनील सैदाणे यांच्या विरुद्ध उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यात माझे पती सुनील सैदाणे हे सन 22 जुन 2015 पासुन मीना अशोक घोडके सोबत घर सोडून निघून गेले आहेत. आमचा घटस्फोट नसतांना त्यांनी या महिलेला पत्नीचा दर्जा दिलेला आहे.मिलन सुनील सैदाणे हे कागदपत्रे खोटा दस्ताऐवज तयार करून, नावात बदल करून सर्व शासकीय कागदपत्रात नोंदी केल्या आहेत. दि. 9/6/2016 रोजी यांना अनैतिक संबंधातून आराध्या सुनील सैदाणे ही मुलगी झाली आहे. त्यामुळे शासन परिपत्रक 2005 चे लहान कुटुंब प्रमाणपत्राचे उल्लंघन केले आहे. तसेच मीना अशोक घोडके यांचा मुलगा ओमकार हर्षवर्धन दिलीप मिश्रा या मुलाला सुनील सैदाणे यांनी स्वतःचे नाव लावुन त्याला स्वतःचा मुलाचा दर्जा दिलेला आहे.त्याचे नाव हर्षवर्धन मीनल सुनील सैदाणे असे केले आहे. सैदाणे यांना अशी चार मुले आज कागदोपत्री नोंद आहे. हे सर्व पुरावे शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी यांनी घेतलेल्या सुनावणी वेळी सादर केली आहेत. सैदाणे यांनी नंतरची दोन मुले शासनापासुन लपवून ठेवली आहेत. म्हणुन धर्मपत्नी सौ वैशाली सुनील सैदाणे यांनी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी धुळे यांचेकडे पुराव्यानिशी तक्रार देवुनही या गंभीर बाबीची दखल घेतली गेली नाही. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या चौकशीतून सदरचा प्रकार खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. तरीही प्रशासन दुर्लक्ष करित आहे. सुनिल सैदाणे यांच्या विरोधात एक वर्षापासून देवपुर पोलिस स्टेशन धुळे व शिंदखेडा पोलिस स्टेशनला शासनाची फसवणूक करून शासकीय दस्ताऐवजात फेरफार म्हणुन गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारी अर्ज दिलेला असतांना अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.पोलिस खाते व प्रशासन दबावाखाली सदर तक्रारदार महिलेचा व मुलांचा मानसिक छळ करीत आहे. काही प्रापर्टी रखेल पत्नीच्या नावे केली असून त्यातून मुलांना हिस्सा मिळावा.गेल्या आठ वर्षांपासून स्वतःचे अनैतिक संबंध व इतर समाज बाहय कृत्य लपविण्यासाठी तक्रारदार महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
वैशाली सैदाणे माझी पत्नी नाही असा कुठलाही न्यायालयीन पुरावा सिद्ध करावा अन्यथा यांच्या विरुद्ध व ज्या गृपवर यांनी ते टाकले आहे त्यांचे नातेवाईक यांच्या विरुद्ध मानहानी चा दावा नाईलाजाने टाकावा लागेल.हया प्रकरणाची चौकशी केली जावी आणि तहसीलदार सुनील सैदाणे यांनी केलेल्या गैरकृत्य बाबत शासन झाल्याशिवाय आम्ही कुटुंब उपोषण सोडणार नाही असे वैशाली सुनील सैदाणे यांनी सांगितले. त्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील वाल्मीक एकलव्य सेनेचे कार्याध्यक्ष गणेश इंगळे, कल्पना चंद्रशेखर सोनवणे नंदुरबार, दिपाली ज्ञानेश्वर सोनवणे शहादा यासह अनेक कोळी समाजातील महिला व बांधव यांचा पाठिंबा मिळत असुन या उपोषणाची शिंदखेडा शहरासह तालुक्यात जबाबदार व्यक्तीबाबतची चर्चा रंगली आहे.